ताज्या बातम्याआरोग्य

Nashik : मुलाचा अचानक मृत्यू; काळजाच्या तुकड्याचा निष्प्राण देह पाहून आईने जागीच सोडला जीव

Nashik : शहरातील नामदेव शिंपी समाजातील मुकुंद पांडुरंग सदावर्ते (वय ६०) यांचे गुरुवारी (दि. ६) सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांची आई, रुक्मिणी सदावर्ते (वय ८५), या पुत्रवियोग सहन करू शकल्या नाहीत आणि धक्क्याने त्यांचेही काही वेळातच निधन झाले.

या दुर्दैवी घटनेमुळे माय-लेकाच्या अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्या. दोघांना शेवटचा निरोप देताना कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर हळहळला.

मुकुंद सदावर्ते यांची प्रकृती काही काळापासून ठीक नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर नाशिकच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी सकाळी ७:३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही जगाचा निरोप घेतला.

नाशिकमध्ये यापूर्वीही माय-लेकाचा एकाच दिवशी मृत्यू

अशीच एक हृदयद्रावक घटना यापूर्वीही नाशिकमध्ये घडली होती. मनमाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय साकूबाई झाल्टे यांचा मुलगा मुकेश हा जन्मताच मनोरुग्ण होता. त्याला बोलता येत नव्हते, त्यामुळे त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आईच्या आधारावर अवलंबून होता.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अचानक मुकेशचा मृत्यू झाला. ही दुःखद बातमी त्याच्या मोठ्या भावाने आईला सांगितली, पण ती आपल्या मुलाच्या निधनाचा आघात सहन करू शकली नाही. अवघ्या काही तासांतच त्यांनीही प्राण सोडले. आयुष्यभर मुलाला एकटे सोडले नाही, तसेच शेवटच्या प्रवासालाही त्याला एकटे जाऊ दिले नाही.

ही दोन हृदयद्रावक घटनांनी संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. माय-लेकाचे अतूट नाते अशा घटना पुन्हा पुन्हा सिद्ध करतात.

Related Articles

Back to top button