ताज्या बातम्याक्राईम

Jalna : मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच टिप्परने मुंगीसारखं चिरडलं, एकाच कुटुंबातील 5 जण ठार, भयानक अपघात

Jalna : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने घराला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २२ फेब्रुवारीच्या पहाटे साडेतीन वाजता घडली.

कशामुळे घडला अपघात?
पाचोडी पुलाच्या बांधकामासाठी आलेले कुटुंब पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचा वेग नियंत्रणात नसल्याने तो थेट त्यांच्या घरावर जाऊन आदळला. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले.

अपघातानंतर संतापाची लाट
या दुर्घटनेनंतर संपूर्ण जालन्यात संताप व्यक्त केला जात आहे. महसूल विभागाला घटनास्थळी बोलावण्यात आले असून, अपघाताची चौकशी सुरू आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेने अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button