Pimpri-Chinchwad : पुण्यातील विद्यार्थीनी साहिती रेड्डीने का संपवलं जीवन? बॉयफ्रेंडकडून त्रास? पोलिसांनी सांगितलं खरं कारण
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहिती कलुगोटाला रेड्डी (Sahiti Reddy) असे या तरुणीचे नाव असून, ती तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. 5 जानेवारी रोजी तिने ताथवडे परिसरातील राहत्या इमारतीच्या 15व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पोलीस तपासात महत्त्वाचे खुलासे
सुरुवातीला या आत्महत्येचे कारण स्पष्ट नव्हते, त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान साहितीने आत्महत्येपूर्वी आपल्या मैत्रिणीला व्हॉईस मेसेज पाठवल्याचे समोर आले. या मेसेजमध्ये तिने आपल्या मोबाईलचा पासवर्ड आणि तो कुठे ठेवला आहे, याची माहिती दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी तिचा मोबाईल हस्तगत करून तपास केला असता, तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेला संदेश आढळून आला.
प्रेमसंबंधांचा तणाव कारणीभूत?
साहितीच्या संदेशानुसार, तिचे महाविद्यालयातील वर्गमित्र प्रणव डोंगरे (20) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रणव तिला संबंध तोडण्याची धमकी देत होता आणि शारीरिक तसेच मानसिक त्रास देत असल्याचा उल्लेख तिच्या संदेशात आढळला. या सततच्या त्रासामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
महीनाभरानंतर उलगडले आत्महत्येचे गूढ
साहितीच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरु असताना तब्बल महिनाभरानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.