Range Rover : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले या सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. केवळ राजकारणात नव्हे, तर इन्स्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्यांच्या तब्बल 509K फॉलोअर्स आहेत, त्यामुळे त्यांचे व्हिडीओ आणि पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
रेंज रोव्हर गिफ्टमुळे चर्चेत
काही महिन्यांपूर्वी निर्मला नवले यांना त्यांच्या नवऱ्याने (शुभम नवले) रेंज रोव्हर गिफ्ट दिली. त्यांनी या अनोख्या सरप्राईजचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. सरप्राईज मिळाल्यानंतरचा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
एका मुलाखतीत त्यांनी या गाडीबाबतची कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या, “माझे नेहमीपासूनच रेंज रोव्हर घ्यायचे स्वप्न होते. मी शुभमला अनेकदा याबाबत सांगायचे. कारण मला हवी ती गोष्ट मिळवायचीच असते आणि शुभम ती मिळवून देतात. त्यामुळे आता नवऱ्याला सांगण्याची सवयच लागली आहे, ‘तू काहीही कर, पण मला हवं ते मिळवून दे!’“
इंजिनिअर ते सरपंच – राजकीय प्रवास
निर्मला नवले या इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्या असून, सध्या कारेगावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे राजकीय वर्तुळातही त्यांची मोठी चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियतेसह त्या राजकीय क्षेत्रातही नवा ठसा उमटवत आहेत.
सोशल मीडियावरून राजकीय प्रवासाला वेग
निर्मला नवले यांच्या ग्लॅमरस आणि तितक्याच प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्यामुळे त्या केवळ सरपंच म्हणूनच नव्हे, तर राजकीय आणि डिजिटल दोन्ही प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय ठरत आहेत.