Valmik Karad : वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या सालगड्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, केले गंभीर आरोप
Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या हत्याकांडात वाल्मिक कराडवरही आरोप लावण्यात आले आहेत. देशमुखांच्या हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीकडे शरण आला आहे.
त्यानंतर त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. याचदरम्यान, वाल्मिक कराडच्या(Valmik Karad) दुसऱ्या पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात काम करणाऱ्या एक सालगड्याने गंभीर आरोप केले आहेत.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे माने कुटुंब ज्योती जाधव यांच्या शेतात मागील सात महिन्यांपासून काम करत आहे. मात्र, या कुटुंबाने दावा केला आहे की, त्यांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोणतेही मजुरीचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे हे कुटुंब उपासमारीच्या स्थितीत आहे आणि शाळेतून मिळणाऱ्या तांदुळावर आपली भूक भागवण्यास भाग पडत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की, बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर 36 एकर जमीन आहे.
या जमिनींचे अंदाजे मूल्य दीड कोटी रुपये आहे आणि या जमिनींची खरेदी मागील दोन वर्षांत करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नवीन आरोप आणि खुलासे समोर येत आहेत, ज्यामुळे वाल्मिक कराडच्या आणि ज्योती जाधवच्या परिस्थितीवर आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत.