Saif Ali Khan : तैमूरनेच वाचवला सैफ अली खानचा जीव! चिमुकल्या तैमूरचा पराक्रम ऐकूण हैराण व्हाल

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकू हल्ला झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पूजा भट्ट, रवीना टंडन यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मुंबई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत सैफच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सैफ अली खान थोडक्यात बचावला असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले, यामध्ये त्याचा मुलगा तैमूर अली खान आणि केअरटेकरने महत्त्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला इब्राहिम अली खानने सैफला रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त होते, परंतु डॉक्टरांनी तैमूर आणि केअरटेकरने त्याला रुग्णालयात आणल्याचे स्पष्ट केले.
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफवर एका अज्ञात व्यक्तीने पहाटे ३:०० वाजता हल्ला केला, त्यानंतर तैमूर आणि केअरटेकरने त्याला रुग्णालयात आणले.