Saif Ali Khan : पाठीतून पाणी लीक, पॅरालिसीसचा धोका, सैफवर 6 तास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगीतली धडकी भरवणारी माहिती

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर आज (दि. 16) मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी एका चोरट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर सैफ यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉक्टर डांगे यांनी काय सांगितले?

डॉ. नितीन डांगे म्हणाले, “सैफ अली खान(Saif Ali Khan) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना कोणताही गंभीर धोका नाही. आम्ही त्यांना निरीक्षणासाठी आयसीयूमध्ये ठेवले आहे, कारण शस्त्रक्रिया बराच वेळ चालली होती. सकाळी सहा वाजता आम्ही ऑपरेशन सुरू केले आणि ते 12 वाजेपर्यंत चालले.

सैफच्या मणक्याजवळ चाकूचा भाग खोलवर घुसला होता, ज्यामुळे मज्जातंतूजवळ इजा झाली होती. तसेच, पाठीमागील द्रव लीक होत होते, ज्यावर आम्ही शस्त्रक्रिया केली. सध्या सैफ पूर्णपणे शुद्धीत आहेत, आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्या त्यांना रुममध्ये हलवले जाईल आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.”

गंभीर जखमा आणि उपचार

डॉ. डांगे पुढे म्हणाले, “हल्ल्यानंतर सैफच्या(Saif Ali Khan) शरिरावर लहान-मोठ्या जखमा होत्या, पण पाठीवरची जखम गंभीर होती. चाकूचा तुटलेला भाग त्यांच्या स्पायनल कॉर्डजवळ खोलवर होता. त्यामुळे आम्ही तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.

सैफला पॅरालिसिसचा धोका होता, पण नशिबाने, कोणतीही कायमस्वरूपी हानी झाली नाही. हातावर आणि मानेवर झालेल्या जखमांवरही टाके घालण्यात आले आहेत. सैफ(Saif Ali Khan) पूर्णपणे शुद्धीत होते आणि त्यांना मोठ्या सर्जरीसाठी थोडी भीती वाटत होती, पण आता ते सुरक्षित आहेत.”

या घटनेनंतर सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर आहे, आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ते लवकरच पूर्णपणे बरे होतील.