ताज्या बातम्याक्राईम

Swargate : बसच्या आजुबाजूला 10-15 लोकं, पण तरुणीने विरोध केला नाही, त्यामुळे गाडेला.. – मंत्री योगेश कदम

Swargate : स्वारगेट एसटी आगारात झालेल्या बलात्कार प्रकरणाची बातमी लपवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या संभाव्य ठिकाणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्तता पाळली होती, अन्यथा तो सावध होऊन फरार झाला असता. या संदर्भात ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पोलिसांची भूमिका आणि गस्त दरम्यानची हालचाल

गृहराज्यमंत्री कदम यांनी स्वारगेट एसटी आगार आणि पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी सांगितले की, स्वारगेट पोलिसांनी त्या रात्री गस्त घातली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत पोलिसांची उपस्थिती दिसते.

रात्री १.३० वाजता पोलीस पथक आगारात आले.

रात्री ३ वाजता पुन्हा एकदा पोलिसांनी स्टँडची पाहणी केली.

त्यामुळे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप असत्य आहे, असे त्यांनी सांगितले.

आरोपीवर आधीपासून गुन्हे, पण माहितीचा अभाव

दत्तात्रय गाडे याच्यावर चोरी आणि इतर गुन्ह्यांचे आरोप आहेत. मात्र, तो पुण्याबाहेरच्या भागातून आल्याने त्याचा रेकॉर्ड पुणे पोलिसांकडे नव्हता. शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष असते, पण ग्रामीण भागातून आलेल्या गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडे नसल्याने अशा घटना टाळण्यासाठी सुधारणा गरजेची आहे, असे कदम यांनी मान्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी ४३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे सीसीटीव्ही एआय आणि फेशिअल रेकग्निशन तंत्रज्ञानावर आधारित असतील, जेणेकरून गुन्हेगार ओळखले जाऊ शकतील आणि पोलिसांना तातडीने सूचना मिळतील.

“तरुणीने विरोध न केल्याने लोकांना समजले नाही” – योगेश कदम

या घटनेबाबत बोलताना योगेश कदम म्हणाले की, शिवशाही बसच्या आजूबाजूला १० ते १५ लोक होते, पण कोणालाही संशय आला नाही. कारण, तरुणीने प्रतिकार केला नाही, त्यामुळे कुठलाही आवाज किंवा झटापट झाली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला.

आता आरोपी ताब्यात असल्याने अधिक तपशील लवकरच स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button