ताज्या बातम्याराजकारण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुण्यात तख्तापलट करणार; पडद्यामागे वेगवान राजकीय हालचाली, मोठा भूकंप?

Uddhav Thackeray : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि रणनीती आखण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. शिंदे गटाने राज्यभरात, विशेषतः पुण्यात, ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, उद्धव ठाकरे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्यांनी लवकरच पुणे दौरा करण्याचे संकेत दिले आहेत.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे पुण्यात येऊन पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार असून, शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. विशेषतः पुणे शहरातील शिवसेनेच्या स्थितीचा आढावा घेऊन, पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत ते महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार शिवसेनेने केला असून, पुण्यात मात्र महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक नेते वसंत मोरे यांनी केली आहे. पुण्यात आघाडी कायम ठेवली तर शिवसेनेला मोठा फायदा होईल, असे त्यांचे मत आहे. तसेच पक्षात काही नाराजी असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.

वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button