---Advertisement---

Uttar Pradesh : वडिलांच्या मॅडमनं त्यांचा गैरवापर केला! जवानानं संपवलं जीवन, वाचलेल्या मुलीने केले गंभीर आरोप

---Advertisement---

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) एका जवानाने कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आरएएफ जवान केशपाल सिंह यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी प्रियंका देवी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या मुलीची प्रकृती मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

घटनेचा तपशील

ही घटना कंकरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणपती विहार परिसरात १६ फेब्रुवारीला घडली. केशपाल सिंह हे आरएएफच्या १०८ व्या बटालियनमध्ये कार्यरत होते आणि गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तिघांना तातडीने आनंद रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी केशपाल सिंह यांना मृत घोषित केले.

केशपाल सिंह यांच्या लेकीचे धक्कादायक आरोप

केशपाल सिंह यांच्या कन्येने या घटनेबाबत एक महिला अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, “महिला अधिकाऱ्याने माझ्या वडिलांचा मानसिक छळ केला, ज्यामुळे त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही.”

तिने पुढे सांगितले की, “माझ्या वडिलांना सुरुवातीला अंबालामध्ये पोस्टिंग देण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव त्यांना तिथून हटवण्यात आले. ही कारवाई त्या महिला अधिकाऱ्यामुळेच झाली.”

वारंवार धमक्यांचा आरोप

केशपाल सिंह यांच्या मुलीच्या म्हणण्यानुसार, “ती महिला अधिकारी वडिलांना सातत्याने धमक्या देत होती. तिने त्यांना आणि आमच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. तसेच आमच्या घरावर छापा टाकण्याची आणि आर्थिक परिस्थिती पूर्णतः बिघडवण्याची धमकीही ती देत होती.”

पोलीस तपास सुरू

या प्रकरणाचा तपास मेरठ पोलीस करत असून “याप्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल,” असे मेरठचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या पोलिसांकडून केशपाल सिंह यांच्या मुलीने केलेल्या आरोपांची सत्यता तपासली जात असून अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---