Aamir Khan : बंगळुरूमध्ये राहते, मुंबईमध्ये स्वतःचं सलून, ६ वर्षांचा मुलगाही सोबत; आमिर खानची नवी प्रेयसी आहे तरी कोण?

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ६०वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. काल झालेल्या बर्थडे पार्टीत आमिरने कबूल केले की तो गौरी स्प्रॅट हिला डेट करत आहे. गेल्या १८ महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये असून, आमिर तिला तब्बल २५ वर्षांपासून ओळखतो.

कोण आहे गौरी स्प्रॅट?

गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची रहिवासी आहे आणि ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊससाठी काम करते. तिची आई तामिळ असून वडील आयरिश आहेत. गौरीला ६ वर्षांचा मुलगाही आहे. तिची आई रीता स्प्रॅट बंगळुरूमध्ये सलून व्यवसाय चालवते.

गौरीने ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण घेतले असून, २००४ मध्ये लंडनच्या आर्ट्स युनिव्हर्सिटीमधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला. सध्या ती मुंबईतील बीब्लंट सलूनही चालवते.

आमिर आणि गौरीच्या नात्यावर कुटुंबाचीही मोहर

आमिरने स्पष्ट केले की तो सध्या गौरीसोबत राहतो, आणि त्याचे कुटुंबही या नात्याबद्दल आनंदी आहे. इतकंच नव्हे, तर गौरीची ओळख तो आधीच सलमान खान आणि शाहरुख खानसोबत करून दिली आहे.

आमिर खानची वैवाहिक वाटचाल

आमिरचे पहिले लग्न रीना दत्ता सोबत १९८६ मध्ये झाले, मात्र २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर त्याने किरण राव सोबत लग्न केले, पण २०२१ मध्ये ते वेगळे झाले.

किरणसोबत विभक्त झाल्यानंतर २०२४ मध्ये आमिर आणि गौरी डेट करायला लागले, आणि आता २०२५ मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप दिले.

आमिर खानच्या पुढील प्लॅनबद्दल उत्सुकता

बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून लांब असलेल्या आमिर खानचे प्रॉडक्शन हाऊस अजूनही सक्रिय आहे आणि त्याअंतर्गत नवे चित्रपट बनवले जात आहेत.

रिपोर्टनुसार, आमिर खानची एकूण संपत्ती ₹१,८६२ कोटींहून अधिक आहे. मात्र, सध्या चाहत्यांना सर्वाधिक उत्सुकता आहे ती – आमिर आणि गौरी लग्न कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची!