गोव्याचे प्रॉमिस करून हनिमूनसाठी अयोध्येला घेऊन गेला नवरा, परत येताच पत्नीने घेतला टोकाचा निर्णय…

सध्या अयोध्येला जाऊन प्रभूरामाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा आहे. अनेकजण तस नियोजन करत आहेत. त्यासाठी योजना आखल्या जात आहेत. असे असताना आता एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. पती अयोध्येला फिरायला घेऊन गेल्याने पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या दोघांचे हनिमूनसाठी गोव्याला जायचे ठरले होते. पतीने मला याबाबत आश्वासन दिले होते. मात्र त्याने तसे केले नाही. माझी फसवणूक केली. जेव्हा फिरायला नेण्याची वेळ आली त्यावेळी तो मला अयोध्या-वाराणसीला घेऊन गेला, असे पत्नीने सांगितले आहे.

भोपाळमधील पिपलानी परिसरातील ही घटना आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. याबाबत अनेकांनी मध्यस्थी करण्याचे देखील प्रयत्न केला. या महिलेने घटस्फोट अर्जात तिच्यासोबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला आहे.

याबाबत पत्नी म्हणाली, आम्ही दोघे कमावतो, परदेशी हनिमूनसाठी जाणं काही अवघड नव्हतं. पण पतीनं यासाठी नकार दिला. भारतातच फिरायला जाऊ असा विचार मांडत त्यानं गोवा आणि दक्षिण भारत याठिकाणी जाऊ असेही सांगितले, मात्र त्याने अयोध्या, वाराणसीसाठी फ्लाईट तिकिट बुक केलं.

एक दिवस त्यानं ही बाब मला सांगितली. १० दिवस ती याबद्दल काहीच बोलली नाही. हनिमूनवरुन परतताच तिने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. यामुळे पतीला धक्काच बसला. माझा पती माझ्यापेक्षा जास्त काळजी त्याच्या कुटुंबाची करतो. त्यामुळे मला या नात्यातून सुटका हवी आहे, असे तिने अर्जात म्हटले आहे.

यामुळे तिची समजूत काढली जात आहे. आता ती ऐकणार की। नाही याबाबत ती स्वतः निर्णय घेणार आहे. यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे मात्र मुलाच्या कुटूंबाला मानसिक धक्का बसला आहे.