Husband Wife Fight : अनुपगढ जिल्ह्यातील रायसिंगनगर पोलिस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी पतीने आपल्या पत्नीवर हल्ला करुन तिला जखमी केले त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे, असं समजून तिला रस्त्यावर फेकून दिले आहे.
याबाबत तपास सुरू असून याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की पतीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. याचा राग आल्याने पतीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला.
त्याने तिच्या गुप्तांगावरही धारदार शस्त्राने वार केले. त्याने तिला विवस्त्र करून रस्त्यावर फेकले. कमलेश कुमार असे त्यांचे नाव असून आठवडाभरापूर्वी झालेल्या वादातून त्याने पत्नीला बेदम मारहाण केली होती. यानंतर हा वाद वाढतच गेला.
पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने त्याने तिचा गळा आवळला. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्याने पत्नीच्या कुटुंबीयांना फोन करून ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. यामुळे तपास केला गेला.
महिला बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रस्त्यात महिलेला त्रास होत असल्याचे पाहून लोकांनी तिला उपचारासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस तपास करत आहेत.