पती आणि मुलांचे हात-पाय बांधले, त्यांच्या डोळ्यांदेखत केले ३ महिलांवर सामूहिक अत्याचार, अन् नंतर…

तीन महिलांवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना पानिपतमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी महिलांच्या कुटुंबासमोरच हे कृत्य केले आहे. पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत हा सगळा प्रकार घडला.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी धारदार शस्त्र घेऊन आले होते. पीडित कुटुंब वास्तव्य करत असलेल्या घऱात चारही आरोपी घुसले होते. आरोपींनी तिन्ही महिलांवर बलात्कार करण्याआधी त्यांच्या कुटुंबातील लोकांचे हात, पाय बांधले होते. 

आरोपींनी पीडितेच्या घऱातील रोख रक्कम आणि दागिनेही लुटून नेले आहेत. आरोपींनी सामूहिक बलात्कार केलेल्या ठिकाणापासून तब्बल एक किमी अंतरावर एका आजारी महिलेवरही हल्ला केला. या या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला.

याठिकाणी आरोपी मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यामुळे याचा तपास सुरू असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पीडितेने माहिती दिली की, रात्री जवळपास 1 वाजण्याच्या सुमारास चार तरुण घरात शिरले. यानंतर त्यांच्या पतींना एका खोलीत बंद केले. यानंतर त्यांनी बलात्कार केला. यावेळी सर्व आरोपींनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते. यामुळे कोणीही कसे दिसत आहेत, हे समजत नव्हते.  

अडीच तास ते बलात्कार करत होते. सकाळी पाच वाजता पीडित महिलांनी गावकऱ्यांना आवाज देत सगळा घटनाक्रम सांगितले. यावेळीच त्यांची सुटका करण्यात आली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.