IND vs AFG : बुमराचा स्पिड अन् रोहित-विराटचा धडाका, अफगानिस्तानला ८ विकेट आणि १५ षटके राखून हरवत भारताचा सर्वात मोठा विजय

IND vs AFG : विश्वचषक 2023 चा 9 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला, जिथे भारताने अफगाणिस्तानला सहज पराभूत केले आणि पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले. न्यूझीलंड 2 सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला ओमराय यांच्या अर्धशतकांमुळे ५० षटकांत २७२ धावा झाल्या. रोहित शर्माचे स्फोटक शतक आणि विराट कोहलीच्या विश्वचषक 2023 मधील सलग दुसरे अर्धशतक यामुळे भारताने अवघ्या 35 षटकांत लक्ष्य गाठले.

टीम इंडियाने सलग दुसरा सामना 8 गडी राखून जिंकला, रोहितने शतक ठोकले, कोहलीचे अर्धशतक आणि बुमराहने चार विकेट घेतल्या. भारतीय संघाने 32 षटकात 250 धावा केल्या असून विराट कोहलीसह श्रेयस अय्यर क्रीजवर उपस्थित होता.

कोहली ४३ तर अय्यर २० धावांवर खेळतहोता. राशिद खानने रोहित शर्माची खेळी संपुष्टात आणली. रोहितला गुगली बॉल वाचता आला नाही आणि तो बोल्ड झाला. त्याने आपल्या डावात 131 धावा केल्या ज्यात 16 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

रोहित शर्माची बॅट सातत्याने धावा करत होती. मात्र, सध्या विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात युद्ध सुरू आहे. आतापर्यंत विराटला नवीनविरुद्ध जास्त धावा करता आल्या नाहीत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे.

त्याने 63 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने ही कामगिरी केली. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 7 शतके झळकावणारा तो फलंदाज बनला आहे. यानंतर लगेचच इशान किशन बाद झाला. आता विराट कोहली क्रीझवर आला आहे आणि चाहते नवीन उल हक गोलंदाजीसाठी येण्याची वाट पाहत आहेत.