IND vs AFG : रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात, कॅप्टनने असा शिकवला धडा, थेट…

IND vs AFG : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. असे असताना आता रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना मोठा निर्णय घेतला असून शुभमन गिलला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर बसवले आहे.

तसेच तिलक वर्माला देखील संघाबाहेर ठेऊन विराट कोहली अन् यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे. त्यामुळे आता रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात अशी चर्चा क्रिडाविश्वात होताना पहायला मिळत आहे. दुसरा टी-20 सामना होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळला जात आहे.

मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशातच आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी रोहित शर्माने किंग कोहलीला संघात स्थान दिले आहे.

यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्माने दुसरा चेंडू मिड ऑफच्या दिशेने टोलवला होता. त्यावेळी रोहितने कॉल देत नॉन स्ट्राईक इन्डला धाव घेतली होती. त्यावेळी शुभमन गिलने धाव घेतलीच नाही.

त्यामुळे टीम इंडियाला पहिलाच मोठा धक्का बसला. रोहित सुसाट सुटला मात्र शुभमन पळालाच नाही. त्यामुळे रोहितला शुभमनच्या चुकीची शिक्षा झाली. त्याला मैदान सोडावे लागले होते. यावेळी रोहित चिडल्याचे देखील दिसून आले होते.

आता टीम इंडिया येणाऱ्या सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अटीतटीचा सामना असणार आहे. ज्या नवीन खेळाडूंना संधी दिली जाणार आहे, त्यांना आपले टीम मधील स्थान टिकवावे लागणार आहे.