IND vs AUS Final : काल झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले.
यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा पराभव झाला. भारताला प्रथम फलंदाजी करताना केवळ २४१ धावा झाल्या. यामुळे परिस्थिती बिकट झाली.
आता रोहित शर्मा याची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो म्हणाला, सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही, आज आम्ही सर्वोतपरी प्रयत्न केले होते मात्र ते अपुरे पडले. या टार्गेटमध्ये आणखी 20 ते 30 धावा होऊ शकल्या असत्या. मात्र त्या झाल्या नाहीत आणि आमचा पराभव झाला.
विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी दमदार भागीदारी केलेली, आमचं 270-80 धावा करण्याचं टार्गेट होतं पण विकेट जात राहिल्या. 240 धावांचा तुम्ही बचाव करत असताना सुरूवातीलाच विकेट मिळवायला हव्या होत्या. मात्र तसे झाले नाही.
हेड आणि लाबूशेन यांनी आम्हाला बॅकफूटला ढकलले. मी कोणतंही कारण देऊ शकत नाही कारण आम्ही पुरेशा धावा केल्या नाहीत आणि आम्ही पराभूत झालो. सामना संपल्यावर रोहितच्या डोळ्यात पाणी आलेले सर्वांनी पाहिले.
रोहितने कर्णधार म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले, रेकॉर्डचा उंबरठा पाहिलं नाही धावांची भूक गड्याने शेवटच्या सामन्यापर्यंत सेल्फलेस बॅटींग केली. मात्र त्याला अंतिम सामना जिंकता आला नाही. भारतीय संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच ऑल आऊट झाला.
सुरुवातीला तीन विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांना त्यानंतर यश मिळवता आलं नाही. त्यामुळे भारताच्या हातून सामना निसटला. तीन विकेट गेल्यावर भारत हा सामना जिंकेल, असे अनेकांना वाटत होतं, पण निराशा झाली.