IND vs AUS : पराभवानंतर ढसाढसा रडले रोहित-विराट आणि सिराज, Video पाहून तुमच्याही डोळ्यातून घळाघळा वाहतील अश्रू

ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) ने ICC ODI World Cup 2023 मध्ये टीम इंडिया विरुद्ध चमकदार कामगिरी करून विजेतेपद पटकावले. अहमदाबादच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 50 षटकांत 241 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि कंपनी खूपच निराश दिसली.

वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो भारतीय संघातील खेळाडूंचा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्ध विजय नोंदवल्यानंतरचा आहे.

झाले असे की, 43व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने दोन धावा काढून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले, त्यानंतर कांगारू खेळाडू विजयाचा आनंद साजरा करताना दिसले.

दुसरीकडे, पॅव्हेलियनमध्ये परतताना भारतीय खेळाडू खूपच निराश दिसत होते. ज्यामध्ये मोहम्मद सिराज सर्वाधिक रडताना दिसला, रोहित शर्मासह टीमचे सर्व खेळाडू खूप भावूक दिसत होते. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचेही डोळे ओलावले. याशिवाय स्टँडवर उपस्थित भारतीय संघाचे समर्थकही अतिशय उदास दिसत होते.

19 नोव्हेंबर रोजी, ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांसमोर होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती आणि संघाला केवळ 241 धावांचेच लक्ष्य देता आले.

प्रत्युत्तरात मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात १९२ धावांची भागीदारी झाली. ट्रॅव्हिस हेडने 137 आणि मार्नस लॅबुशेनने 58 धावा केल्या. या दोन फलंदाजांना बाद करणे भारतीय खेळाडूंसाठी खूप कठीण होते, ज्यामुळे संघ सामना (IND vs AUS) सहा विकेटने हरला.