World Cup 2023 : विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात पुण्यात खेळला गेला. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेशला निर्धारित 50 षटकात 8 विकेट गमावून केवळ 256 धावा करता आल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या शानदार खेळीमुळे भारताने 41.3 षटकांत केवळ 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
भारताच्या जबरदस्त फलंदाजीसमोर बांगलादेशने विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे टीम इंडियाने षटकातच सहज साध्य केले. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शुभमन गिल आणि रोहित शर्माने दमदार सुरुवात करून दिली.
दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी झाली. ज्यामध्ये रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावा आणि शुभमन गिलने 55 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव पुढे नेला.
मधल्या फळीत दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. अय्यरने 19 धावा केल्या. विराटने १०३* धावांची नाबाद खेळी खेळली. के एल राहुलनेही अखेरपर्यंत नाबाद 34 धावांचे योगदान दिले.
या स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीचा मोठा प्रभाव पडला आहे. बॉलिंग युनिटमधील प्रत्येक गोलंदाजाने विश्वचषकात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने कर्णधाराला विकेट्स मिळवून दिल्या आहेत.
बांगलादेशविरुद्ध सुरुवातीला तन्झिद हसनने ५१ धावांची तर लिटन दासने ६६ धावांची खेळी खेळली. बुमराह-सिराजला सुरुवातीला रोहित शर्माला विकेट मिळवता आली नाही, तेव्हा तो आपला विकेट घेणारा गोलंदाज कुलदीप यादवकडे वळला.
कुलदीपने तनजीद हसनला बाद करून भारताला ब्रेक दिला. त्यानंतर जडेजाने दुसऱ्या टोकाकडून दबाव कायम ठेवला. त्यामुळे बांगलादेशचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करू शकला नाही. कर्णधार शांतो 8 धावा करून स्वस्तात बाद झाला आणि मेहदी हसन मिराजने 3 धावा केल्या.
मात्र, यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने 30 आणि महमुदुल्लाहने 46 धावा केल्या. बुमराह-सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी 2-2 विकेट घेतल्या. कुलदीप आणि ठाकूर यांना 1-1 विकेट मिळाली.