IPL 2024 : मुंबईच्या ताफ्यात नवे शिलेदार! ‘या’ खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा…

IPL 2024 : आयपीएलच्या येत्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सध्या पार पडत आहे. यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघातून खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने अनेक नवीन खेळाडू आपल्याकडे घेतले आहेत. मुंबईने मोठा डाव खेळला असून काही तगड्या आणि युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे.

मुंबईने गेराल्ड कोएत्जी याला संघात जागा दिली. कोएत्जीची मुळ किंमत 2 कोटी होती. मात्र, मुंबईला बुमराहच्या जोडीचा गोलंदाज हवा असल्याने मुंबईने 5 कोटीची किंमत मोजून गेराल्ड कोएत्जी याला घेतले. तर दिलशान मधुशंका याला देखील मुंबईने संधी दिली आहे. यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

मुंबईने 4.60 कोटी मोजत त्याला आपलं केलं. त्याचबरोबर श्रेयस गोपाल याला मुंबईने त्याच्या बेस प्राईजवर 20 लाखात खरेदी केल. तसेच मुंबईने नुवान तुषारा, अंशुल कंबोज आणि ऑलराऊंडकर नमन धीर यांना संघात सामील केले. नव्या कर्णधाराबरोबरच आता नव्या दमाचे खेळाडू मुंबई इंडियन्सचे भविष्य लिहिणार आहे.

संघात गेराल्ड कोएत्जी 5 कोटी, दिलशान मधुशंका – 4.6 कोटी, श्रेयस गोपाल 20 लाख, मोहम्मद – 1.5 कोटी, नुवान तुषारा – 4.8 कोटी, अंशुल कंबोज – 20 लाख, नमन धीर – 20 लाख, शिवालिक शर्मा 20 लाख असे नवीन खेळाडू दाखल झाले आहेत.

यामुळे आता मुंबईची टीम मजबूत झाली आहे. टीमला आता यंदाच्या आयपीएलमध्ये किती यश मिळणार हे लवकरच समजेल. यावेळी मुंबईचा कर्णधार देखील बदलला आहे. यामुळे हार्दिक पांड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईने कर्णधार बदलला यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. मात्र आता तो कशी कामगिरी करतोय हे समजेल. गुजरातमध्ये असताना त्याने टीमसाठी चांगली कामगिरी केली होती. यामुळे आता मुंबईमध्ये असताना देखील तो तसाच खेळ करणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.