अभिनेता आमिर खानची मुलगी होणार पुण्याची सून; ‘या’ तारखेला वाजणार सनई चौघडे

बॉलिवूडचे तीन खान नेमहीच चर्चेत असतात. सध्या आमिर खान आणि तिच्या मुलीची चांगलीच चर्चा आहे. कारण आमिर खानची मुलगी इरा खानचे लग्न ठरले आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा झाला होता.

साखरपूड्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. साखरपूड्याला काही महिने झाले असून लवकरच त्यांचे लग्न होणार आहे. त्या लग्नाच्या तयारीलाही आता सुरुवात झाली आहे. इराने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने याबाबत भाष्य केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इरा आणि नुपूर एकमेकांना ओळखतात. गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. विशेष म्हणजे नुपूर हा फिटनेस ट्रेनर असून त्याने आमिर खानलाही ट्रेन केलं आहे. नुपूरनेच इराला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती.

नुपूर हा मुळचा पुण्याचा आहे. लग्नाची मागणी घातल्यानंतर इराने त्याला होकार दिला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने सुद्धा लग्नाला होकार दिला. त्यामुळे त्यांचा साखरपूडा पार पडला असून लवकरच लग्न होणार आहे, असे इराने सांगितले आहे.

इराने एक मुलाखत दिली आहे. त्यावेळी तिला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली की, मला लवकरात लवकर लग्न करायचे होते. पण आम्हाला एका खास तारखेला लग्न करायचे आहे. ती तारीख म्हणजे ३ जानेवारी. तसेच तिने ३ जानेवारीलाच का लग्न करायचे आहे? याचेही उत्तर तिने दिले आहे.

आमच्यासाठी ३ जानेवारी ही तारीख खुप खास आहे. कारण त्या तारखेलाच आम्ही पहिल्यांदा एकमेकांना किस केलं होतं. त्यामुळे आम्ही पुन्हा ३ जानेवारीची वाट पाहत असून तेव्हा आम्ही लग्न करणार आहोत, असे इराने सांगितले आहे. पण ते लग्न कुठे करणार आहे याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.