Jayaprada : अभिनेत्रीने 10 रुपयांसाठी केले ‘हे’ काम, 3 मुलांच्या वडिलांशी केले लग्न पण कधीच होऊ शकली नाही पत्नी

Jayaprada : अनेकदा सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि चाहत्यांनाही ते आवडतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, 80 च्या दशकातील एका अश्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो मिळाला आहे जिने अभिनयाने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केल आहे.

चित्रपटांसोबतच तिने पुढे राजकारणातही एन्ट्री केली. या मुलीचा जन्म एका तेलगू फिल्म फायनान्सरच्या घरी झाला. अगदी लहान वयातच शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या 12 व्या वर्षी फिल्मी दुनियेत प्रवेश केला.

या अभिनेत्रीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी ₹ 10 फी मिळाले. पुढे ती राजकारणाकडे वळली आणि इथेही तिने आपली छाप सोडली. अभिनेत्रीला यांना डान्समध्ये पारंगत होते. जर तुम्हाला या अभिनेत्रीला अजून ओळखता आले नसेल.

तर आम्ही तुम्हाला सांगतो की ती दुसरी कोणी नसून जयाप्रदा(Jayaprada )आहे. जिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली प्रतिभा दाखवली आहे. तिने 80 आणि 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. जयाप्रदा(Jayaprada) यांचे नृत्यातही प्राविण्य होते.

पण तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आणि तिच्या लग्नाबाबातही जास्त प्रकाशझोतात आली. खरं तर, आम्ही तुम्हाला सांगतो की, आपल्या करिअरच्या शिखरावर असताना जयाप्रदा(Jayaprada) यांनी चित्रपट निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी लग्न केले, जे आधीच विवाहित होते आणि तीन मुलांचे वडील होते.

यानंतर तिला खूप काही सहन करावे लागले. तिचे लग्न सुरुवातीपासूनच वादांनी भरलेले होते कारण चित्रपट निर्मात्याने जयाप्रदाशी लग्न केले परंतु नंतर त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिला. आपल्या पहिल्या पत्नीशी लग्न झाल्यामुळे, श्रीकांतने कधीही जयाप्रदाला(Jayaprada) पत्नीचा दर्जा दिला नाही किंवा त्याने तिला कधी स्वीकारले नाही.