Kalyan Crime News: प्रेमासाठी कायपण! बॉयफ्रेंडसाठी तरूणीने मारली तलावात उडी; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Kalyan Crime News: कल्याण पूर्वे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यूव झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच एका तरूणीने तलावात उडी मारली. पण सुदैवाने या मुलीला वाचवण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावात पोहण्यासाठी गेलेल्या महेश भाटिया या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तरूणीला वाटले की, तिचा तो प्रियकर आहे.

‘तलावात एका व्यक्तीने उडी घेतली’, हे ऐकून एका तरुणीने तलावात उडी मारली. पण तिचा जीव एका व्यक्तीने वाचवला आहे. महेश भाटिया हा तरुण काल सायंकाळी नांदिवली तलावात पोहण्यासाठी गेला होता.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडला आणि त्याच्या मृत्यूव झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.

त्यावेळी, तलावाजवळ उभी असलेली एक तरुणीने अचानक तलावात उडी मारली. तिला पाहून शुभम शेट्ये या तरुणही तलावात उडी मारली आणि तिला वाचवले. या घटनेमुळे कल्याण नांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तरुणीने बाहेर येताच सांगितले की, तिच्या प्रियकराने तलावात उडी मारली म्हणून मीही उडी मारली. मात्र, तरुणीच्या आधी उडी मारणारा तिचा प्रियकर नव्हता. त्या व्यक्तीचे नाव महेश भाटिया आहे. तो तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.