Kiran Karmarkar : लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या शो चे करोडो चाहते आपल्याकडे आहेत. या शो मध्ये स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. यामध्ये अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले आहेत.
ज्यामध्ये अभिनेत्री रिंकू धवन हिचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध असलेली रिंकू सध्या बिग बॉसच्या घरात बंद आहे. ती सुप्रसिद्ध मराठी अभिनेते किरण करमरकर यांच्या प्रेमात पडली. २००२ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले.
असे असताना मात्र, १५ वर्षांच्या या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. या जोडीला एक मुलगा असून घटस्फोटानंतरही त्यांनी या नात्यावरील परिणाम त्यांच्या मुलावर होऊ दिला नाही. मात्र याची चर्चा सगळीकडे रंगली.
किरण आणि रिंकू यांचा चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. ते घटस्फोट होण्याआधी एक वर्ष वेगळे राहत होते. याबाबत ते म्हणाले, २००२ मध्ये आम्ही लग्न केलं असून आमच्या लग्नाला १५ वर्ष पूर्ण झाली. सर्वात आनंदाची बाब म्हणजे आम्हाला एक मुलगा आहे.
दरम्यान, एक वेळ अशी आली होती की, आमच्या जीवनातील काही गोष्टींमुळे आमचे दोघांचे पटत नव्हते. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. आम्ही आमच्या मुलाला यासाठी तयार करू आणि त्याला हे सगळं समजावून सांगू की, आम्ही वेगळे होत आहोत. मात्र, आज तो आमच्या दोघांबरोबर राहू शकतो.
त्याला सांगितले की, आम्ही तुला चांगल्या, वाईट काळात मदत करू. जिथे तो चुकला तिथे त्याच्यात सुधारणा करू. सणासुदीच्या दिवसात किंवा मुलाच्या विविध कार्यक्रमावेळी आम्ही त्याच्याबरोबर असतो, असेही त्यांनी सांगितले आहे.