Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर अस बोलला की…

Koffee With Karan : करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो सतत चर्चेत असतो. यामध्ये अनेकजण सहभागी होत असतात. अशातच आता या शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण आणि रोहित शेट्टीची जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.

याबाबत समोर आलेल्या प्रोमोमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी करण जोहरच्या मंचावर हजेरी लावली. यामध्ये करणने विचारलेल्या प्रश्नावर अजय देवगणने अशी काही उत्तरं दिली की याची जोरदार चर्चा सुरू झाली. याबाबत विडिओ देखील व्हायरल होत आहे.

यामध्ये तू पार्टीला का जात नाहीस? असा प्रश्न करण विचारतो. त्यावर मला कोणी फोन करुन बोलवत नाही, असं उत्तर अजय देतो. तुझे फोटो एअरपोर्टवर का क्लिक होत नाही? असा प्रश्न करणने विचारल्यावर मी त्यांना फोन करून बोलवत नाही, असेही अजयने सांगितले.

तसेच या इंडस्ट्रीत तुझा दुश्मन कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर ऐकून करणच गप्प झाला. एकेकाळी करण तूच माझा दुश्मन होतास, असे उत्तर अजयने दिले. अजयच्या या उत्तराने करण निशब्द झाला. पुढे त्याने विचारले, काजोल तुझ्याशी बोलत नसेल तर त्याचं कारण काय असतं.

त्यावर, मी त्याच दिवसाची वाट पाहत आहे, जेव्हा ती माझ्याशी बोलणार नाही. यावेळी एकच हशा पिकला. यामुळे हा एपिसोड आगळा वेगळा असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत कॉफी विथ करणच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली आहे. याठिकाणी अनेक कलाकार मोठे गौप्यस्फोट देखील करतात.