Lalit patil : मोठमोठे गुन्हेगार सुटतात, ललितने काय केलंय, त्याचा एन्काऊंटर करू नका; आईची कळकळीची विनंती

Lalit patil : पुण्यातील ससून रुग्णालयातून गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांना ही अटक केली. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. याबाबत सध्या तपास सुरू आहे.

ललितच्या अटकेनंतर आता याप्रकरणी आणखी मोठी नावे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ललित पाटील याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचा एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबत त्याची आई म्हणाली, ललितने काही मोठा गुन्हा केला नाही. जे मोठे मोठे गुन्हे करतात ते सुटतात, आणि फिरतात. मग ललितने अस काय केलंय? त्यामुळे त्याचा एन्काऊंटर करू नका, असे म्हटले आहे.

त्याच्यामागे २ मुले आणि आई वडील आहेत. मला त्याचा एन्काऊंटर होईल अशी भीती वाटते. त्यामुळे असे करू नका. पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली. ललित सापडला तर त्याचा एन्काऊंटर करू असं पोलिसांनी धमकी दिली होती.

त्यामुळे मला भीती वाटते. ललितला फसवले आहे. जी शिक्षा असेल ती भोगावी असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच मुंबई पोलिसांना तपासात ललितने सहकार्य करावे. त्याला फसवून या मार्गाला टाकले गेले. त्याला टॉर्चर करण्यात येत होते, असेही म्हटले आहे.