पंढरीला निघाले, वाटेत जेवायला थांबले, हॉटेलमध्ये दोस्तानेच केली गेम, इंदापूर गोळीबाराचे भयंकर सत्य आले समोर

इंदापूर शहरात तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये ही घटना घडली. याच घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

तसेच तो एक महिन्यापूर्वीच जेलमधून सुटून आला होता. आता पोलीस तपास धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा हा गोळीबार झाला, तेव्हा सोबत जेवायला बसलेल्या साथीदारानेच घात केल्याची माहिती आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे. पंढरपूरला जात असताना ते सगळे हॉटेलमध्ये तो जेवायला थांबले होते. असे असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करुन धनवेची हत्या करण्यात आली.

त्याच्यासोबत असणारा जेवण करणारा सहकारी या कटात सहभागी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे. यामध्ये 10 आरोपी असल्याची माहिती आहे. १० आरोपी हे विविध गुन्ह्यांमध्ये देखील सहभागी असल्याचे पुढे आले आहे.

सध्या पोलीस त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे आहेत याची तपासणी करत आहेत. या आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली असून याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी याबाबत लगेच तपास सुरू केला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गोळीबार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे यावर आळा बसला पाहिजे.