दारू, कंडोम आणि आग, दोन भावांच्या हत्येमागील धक्कादायक प्रकार आला समोर, घटनेने सगळेच हादरले….

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी दोन चुलत भावांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे दारुच्या बाटल्या, कंडोम खोलीत ठेवून पेट्रोल ओतून या दोन भावांना जाळण्यात आले.

कुठल्यातरी कारणाने खोलीत आग लागली असावी, असा अंदाज सुरुवातीला होता. पण, घटनेच्या पाच दिवसांनी तपासातून असे दिसून आले की दोघांना जिवंत जाळून मारण्यात आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत आरोपीने एक प्लॅन तयार केला होता. त्याने या दोघांजवळ दारुची बाटली आणि कंडोमचं पॅकेट ठेवले. त्यानंतर दहा लिटर पेट्रोल ओतून दोघांना पेटवले. त्याने प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल टाकून त्यांच्यावर फेकले. यामुळे ही आग खूपच भडकत गेली. यामुळे त्यांचे निधन झाले.

घटनेनंतर कानपूर पोलिसांनी तपासला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं तर तिथे दोघांचे मृतदेह पूर्णपणे जळाले होते, घरातील सामानाही जळून खाक झालं होतं. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली.

दरम्यान, पोलीस चौकशीत विनोद आणि बबलूची चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना कळालं की त्या रात्री त्यांना भेटायला कल्याण सिंग नावाची एक व्यक्ती आली होती. जेव्हा पोलिसांनी विनोद आणि बबलूची चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात असं लक्षात आलं की ज्या घरात आग लागली त्याचा दरवाजा उघडा होता. जर घरात आग लागली तर हे दोघे बाहेर का पळाले नाही. जर, त्यांनी स्वत: आग लावली असेल तर त्यांनी दार बंद का केले नाही, यावरून पोलिसांनी तपास सुरू केला.