लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपने आपल्या उमेदवारांची अजून एक यादी जाहीर केली आहे. आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना तिकीट देण्यात आलं आहे. गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपने सोलापूरमध्ये उमेदवार बदलला आहे. राम सातपुते यांच्यासमोर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे आव्हान असणार आहे.
भाजपकडून सर्वसामान्य तरुणाला उमेदवारी दिल्याने ही लढाई म्हणजे घराणेशाही विरोधाची लढाई असल्याचे मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. याठिकाणी जोरदार लढत होईल, असे सांगितले जात आहे. आता उमेदवार प्रचाराला लागले आहेत.
राम सातपुते यांनी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नावात ‘राम’ असल्याने भाजपला हा मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यावर निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत जोरदार होईल.
दरम्यान, सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कापण्यात आले आहे. सोलापूरमधून आता राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत. त्यांची लोकप्रियता देखील जास्त आहे.
दोन दिवसांपूर्वीच राम सातपुते यांनी सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आता खासदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.