सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये २०१९ मध्ये भाजपने जिंकलेल्या २३ आणि हरलेल्या २ जागांची चर्चा करण्यात आली. आता काही जागांवर उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. भाजप धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती देखील पुढे येत आहे.
यामध्ये आता अहमदनगर दक्षिण मधून सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून उन्मेष पाटील, बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी या भाजपच्या खासदारांची तिकीट कापली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे आता अंतिम क्षणी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच शिवसेनेकडून बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, अशा महाराष्ट्रातील एकूण १२ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे आता या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.
तसेच या बैठकीत नागपूर – नितीन गडकरी, जालना – रावसाहेब दानवे चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, पुणे – मुरलीधर मोहोळ, सांगली – संजयकाका पाटील, भिवंडी – कपिल पाटील, दिंडोरी – भारती पवार, बीड – पंकजा मुंडे यांची नावे फिक्स झाल्याचे सांगितले जात आहे.