Loksabha 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सध्या सर्वच पक्ष हे उमेदवार शोधत आहेत. यामध्ये आता भाजपने आता आघाडी घेतली आहे. आता भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव असणार आहे. तसेच वरिष्ठ मंत्र्यांची देखील नावे असणार आहेत. यामुळे यामध्ये नेमकं कोणाची नावे आहेत हे लवकरच पुढे येईल.
100 उमेदवारांची घोषणा भाजपच्या पहिल्या यादीतून करण्यात येईल. आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. मात्र यामध्ये अनेकांना धक्का दिला जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात आजी-माजी मंत्र्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आता पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आणि सुधीर मुनगंटीवार हे तीनही भाजप नेते लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. भाजपकडून लोकसभांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, मंत्री गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे आता पंकजा मुंडे यांना नेमकं कुठे संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामुळे या तीनही नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. भाजप सरकारी अधिकाऱ्यांना तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची प्रतिक्रिया देखील विरोधी पक्षांनी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.