LokSabha : लोकसभेच्या ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक निकाल, सत्ताधारी भाजपची उडाली झोप, जाणून घ्या…

LokSabha : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेते पक्ष देखील बदलत असून यावेळी देखील देशात मोदींचीच हवा दिसणार की विरोधकांचे बळ वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असे असताना आता सी वोटर या संस्थेने केलेला सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांवर कोण बाजी मारणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे चित्र कसे असणार याचा अंदाज समोर आला आहे.

यामध्ये धक्कादायक निकाल हाती येण्याची शक्यता आहे. एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळू शकतात. मविआला २६ ते २८ तर महायुतीला १९-२१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यात इतरांना ०-२ जागा मिळू शकतात. महाराष्ट्रात मविआच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढणार आहे. मविआला लोकसभेला ४१ टक्के मतं मिळू शकतात. तसेच महायुतीला ३७ टक्के मतं मिळतील.

तसेच इतरांना २२ टक्के मतं मिळू शकतात. यामुळे आता प्रत्यक्षात काय चित्र समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील जनता कुणाला कौल देणार हे प्रत्यक्ष निवडणुकीनंतर समोर येईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलेच यश मिळाले आहे. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे निवडणुकीत काय घडामोडी घडणार हे लवकरच समजेल.