love story : प्रेम कधीही, कुठेही, कोणाशीही होऊ शकते. वय, दिसणे, श्रीमंती किंवा गरिबी यांचा काहीही संबंध नाही, परंतु कधीकधी प्रेमकथा खूप धक्कादायक असतात. सध्या सोशल मीडियावर एका पाकिस्तानी जोडप्याची प्रेमकहाणी व्हायरल होत आहे, जी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.
खरं तर, एका 18 वर्षाच्या मुलाने प्रेमात पडून 35 वर्षांच्या मुलीशी लग्न केले आहे. शहजाद असे या मुलाचे नाव असून, दूरच्या नातेवाईक असलेल्या मुलीचे नाव कोमल असे आहे. त्यांची प्रेमकहाणी आणि लग्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहजाद शाळेत असताना कोमलच्या प्रेमात पडला होता. घरच्यांनी खूप विरोध केला आणि मुलाला मारहाणही केली, पण प्रेम म्हणजे प्रेम असतं, दोघांच्या वयात मोठा फरक असतानाही त्यांच्या लग्नाला होकार दिला.
दोन्ही जोडप्यांच्या प्रेमकथेबद्दल एक गोष्ट खूप चर्चेत आहे ती म्हणजे शेहजाद कोमलसोबत राहिला नाही तर त्याला झोपेचा त्रास होतो. दोघेही एकमेकांना प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. शहजाद कोमलला पिंकी म्हणून हाक मारतो आणि कोमल त्याला मिठू म्हणते.
शेहजाद आणि कोमलची लव्हस्टोरी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले आहे, ‘मला वाटते की हा (मुलगा) 13 वर्षांचा आहे, 16 वर्षांचा नाही.’ दुसर्या यूजरने लिहिले आहे, ‘ती 35 वर्षांची महिला आहे, मुलगी नाही.’ तिसर्याने लिहिले आहे, ‘मी विश्वास ठेऊ शकत नाही के हे खर आहे.