Madhya Pradesh news : कुटुंब हॉटेलमध्ये जेवायला आले, जेवणाच्या टेबलवरच तरुणाने प्राण सोडले, उडाली खळबळ

Madhya Pradesh news : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. यात एक व्यक्ती जेवण करत असताना अचानक खाली कोसळतो आणि जागीच प्राण सोडतो. यामुळे उपस्थित असलेल्या कुटूंबाला एकच धक्का बसतो.

ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथील आहे. एक व्यक्ती कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. तिथे सर्व लोक जेवणाच्या टेबलवर बसलेले होते. यावेळी ही घटना घडली आहे. अचानक एका तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि तो टेबलवरच खाली पडला.

नंतर कुटुंबातील लोक त्याला सांभाळण्यासाठी पुढे आले. पण काही कळायच्या आतच त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे मोठी पळापळ झाली. सध्या भारतात गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

यात तरुणांचा नाचताना, खेळताना किंवा चालता-चालताही अनेक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये असलेल्या व्यक्तीला अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि अचानक तो खुर्चीवरच खाली कोसळला.

दरम्यान, कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला सावरायचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी जागीच जीव सोडला होता. सहकुटुंब जेवायला आले असताना भलतंच अक्रित घडल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. 

दरम्यान, हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा भयावह क्षण चित्रीत झाला आहे. हॉटेलमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सध्या यामुळे कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही.