Mahadev Jankar : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे कोण कुठून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद अधिक असल्यामुळे आपण या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून ती निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाचे गणिते बिघडणार आहेत. याबाबत ते म्हणाले, परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या ठिकाणी आपला एक आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात आहेत.
तसेच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद अधिक आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताब्यात आहेत. याचा त्यांना फायदा होऊ शकतो.
दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हटकर, धनगर, माळी, वंजारी मायक्रो ओबीसी यांच्यासह अनुसूचित जाती यांचे मिळून जवळपास १५ लाख मतदान आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकतो. यामुळे आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
तसेच ते म्हणाले, सध्या तरी कुणासोबत आमची युती झाली नाही. आम्ही स्वतः सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे बूथ रचनेचे ९०% काम पूर्ण झाले आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी काम करत असल्याचेही ते म्हणाले.