महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा परदेशात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक…

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना आता अजूनच आगीत तेल ओतण्याचे काम सरकारकडून केलं आहे. महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही.

असे असताना मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अजूनच आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रावर हा अन्याय का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

केंद्राच्या या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच आक्रमक झाले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर भेदभाव केला जात असल्याचे यावरून दिसून येते. असल्याची टीका आता सरकारवर होत आहे. केंद्र केंद्राने 8 डिसेंबर पासून महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी लागू केली.

या निर्णयामुळे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. गुजरातमधील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी, केंद्राच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक कंपन्या, तसेच उद्योग व्यवसाय हे गुजरातला नेले आहेत. यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. यामुळे तरुण नाराज आहेत. तसेच रोजगार देखील वळवण्याचे सांगितले जाते.

अशातच आता शेतकरी देखील नाराज झाले आहेत. राज्यात कांदा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर आहेत. कांदा हा एक महत्वाचा विषय आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. अशीही शक्यता नाकारता येत नाही.