Maharashtra Political : राजकारणात पुन्हा होणार भूकंप? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रकाश आंबेडकरांची खुली ऑफर, नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

Maharashtra Political : सध्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तसेच महाविकास आघाडी जागा वाटपावर चर्चा करत आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू आहे.

असे असताना वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केल्याने ठाकरे गटाचे टेन्शन वाढले होते.

असे असताना आता तर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत थेट ऑफरच दिली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केली आहे.

असे असताना मात्र आता आंबेडकरांनी एकनाथ शिंदे यांना सोबत येण्याचे आवाहन केल्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. तसेच महाविकास आघाडीत देखील येण्याबाबत शंकाच उपस्थित केली जात आहे.

याबाबत ते म्हणाले, एक अट आहे, एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडून आमच्यासोबत यावं, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मराठा समाजासाठी हिरो ठरले आहेत.

तसेच या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंबाबत मराठा समाजाची सहानूभुती वाढली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार हे लवकरच समजेल. मात्र यामुळे सगळेच टेन्शन मध्ये गेले आहेत.