गुरुवारी मुंबईच्या बांद्रा भागातील सैलूनबाहेर बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दिसली. यावेळी तिने साधा आणि आकर्षक असा व्हाईट शर्ट आणि शॉर्ट परिधान केला होता. तिच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विशेष म्हणजे, 51 वर्षांच्या मलायकाचा हा लूक तिला तिच्या वयापेक्षा खूपच तरुण दाखवत होता.
मलायकाने शर्टखाली ब्रा घातली नव्हती, तसेच शर्टची वरची दोन बटणे उघडी ठेवली होती. तिच्या या पेहरावामुळे तिला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पॅपराझींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर ट्रोलिंगचा वर्षाव
मलायकाच्या व्हिडिओवर एक यूजरने लिहिले, “वृद्धापकाळातही तरुणपणाचा घमंड आहे.” तर आणखी एकाने कमेंट केली, “या लोकांना शर्टखाली काही घालायचं नसतं का?”
याशिवाय, एका यूजरने लिहिले, “या लोकांना जमलं तर ते कपडे घालणंही टाळतील.” दुसऱ्या यूजरने ट्रोल करत म्हटलं, “आंटीजी थंडीतही उन्हाळ्याचे कपडे घालत आहेत.”
फिटनेससाठी प्रसिद्ध मलायका
मलायका अरोरा फिटनेससाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमीच फिटनेसशी संबंधित व्हिडिओ शेअर करताना दिसते, ज्यातून ती अनेकांना प्रेरणा देते. तिचा हा साधा आणि सिम्पल लूक जरी काहींना आवडला असला, तरी ट्रोलिंगमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.