तरुण बसची वाट बघत उभा होता, अचानक दोघे आले अन्…; घटनेने मुंबई हादरली

वाशीतील जुहूगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे बसची वाट पाहत बसलेल्या एका तरुणावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्राने हल्ला करुन त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना
घडली आहे.

याबाबत पोलीस तपास सुरू आहे. घटनेनंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर देखील हल्लेखोरांनी शस्राने प्राणघातक हल्ला करुन मोटारसायकलवरुन पलायन केले आहे. यामुळे याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुकेश उर्फ मंटु कुमार यादव (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कोपरखैरणे येथे राहत होता. तो एका बारमध्ये काम करत होता. घटनेदिवशी तो काम करून घरी जात होता.

तसेच तो वाशी जुहूगाव येथील कपिल किनारा या बारमध्ये काम करत होता. बारमधील काम संपवून मंटु कुमार यादव हा कोपरखैरणे येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यासाठी तो पावणे पाच वाजण्याच्या सुमारास फिजिक्स जिमच्या बिल्डिंगमधील तळमजल्यावरील ओम सिद्धिविनायक होमीयोपेथी दुकानाच्या कट्ट्यावर बसची वाट पाहत बसला होता.

याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मंटु कुमार यादव याच्या हातामधील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने याचवेळी दुसऱ्या हल्लेखोराने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्राने मंटु कुमार यादव याच्या छातीवर तसेच कपाळावर आणि हातावर वार केले.

त्याने आवाज केल्याने अजून एकजण मदतीसाठी आला मात्र त्याच्यावर देखील हल्ला करण्यात आला. त्यानंतर दोघेही हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले. या घटनेमुळे मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.