माझं लग्न फक्त मीडिया पुरतं होतं, प्रसिद्धीसाठी होतं; मानसी नाईकचा धक्कादायक खुलासा

मानसी नाईकने आपल्या अभिनयाने आणि आपल्या डान्समुळे एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या सारख्या गाण्यांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. ती तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.

मानसीने प्रदीप खरेराशी लग्न केलं होतं. पण आता तिने त्याला घटस्फोट दिला आहे. तिने यावर भाष्य केलं नव्हतं. पण आता एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला आहे. तिने घटस्फोटामागचे कारणही सांगितले आहे.

मानसी नाईकने भार्गवी चिरमुलेसोबत गप्पा मस्ती हा पॉडकास्ट केला आहे. त्यामध्ये बोलताना तिने अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. तसेच दुसऱ्या लग्नाचे संकेतही दिले आहे. आपल्याला नक्की काय हवंय हेही तिने सांगितलं आहे.

प्रत्येक मुलीच्या बकेट लिस्टमध्ये तिची एक इच्छा नक्की असते की तिने लग्न करावं, तिचं कुटुंब असावं. मी लग्नानंतर बांगड्या घातल्या. भांगेत कुंक लावलं. सर्व गोष्टी मी प्रेमाने केल्या. पण मी त्यातून आता बाहेर पडलीये, असे मानसी नाईकने म्हटले आहे.

मी आता खुप आनंदी आहे. मला लग्न करायचं होतं. माझं कुटुंब असावं असं मला वाटतं होतं. पण खरंतर रिलपर्यंतच हा प्रवास होता. फक्त मीडिया आणि प्रसिद्धीसाठी या सर्व गोष्टी होत्या. प्रसिद्ध मिळाल्यानंतर नंतर काही लोक बदलतात, माझ्यासोबत असंच काहीसं झालं, असा खुलासा करत मानसीने प्रदीपवर आरोप केले आहे.

मला खुप गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पण त्यातील एकही गोष्ट खरी नव्हती. मला सुन म्हणून बायको म्हणून एक कुटुंब हवं होतं. यावेळी जरी ते अपुर्ण राहिलं असलं तरी मी ते नक्की पुर्ण करेन. कारण माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. मला आई व्हायचंय. मला माझ्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या आहे, असेही मानसीने म्हटले आहे.

जानेवारी २०२१ मध्ये मानसी नाईकने लग्न केले होते. प्रदीप खरेरा असे तिच्या पतीचे नाव होते. प्रदीप हा एक बॉक्सर आहे. लग्नाआधी ते रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही सोशल मीडियावर खुप चर्चेत असायचे. एकमेकांसोबतचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले होते. पण लग्नानंतर वाद झाल्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला आहे.