Pushkar Jog: “तर दोन लाथा घातल्या असत्या…”, मराठी अभिनेता पुष्कर जोग का संतापला? पोस्ट शेअर करत म्हणाला…

Pushkar Jog : सध्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान मनोज जरांडे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग यांने जात विचारणाऱ्या BMC कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

पुष्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण पुष्करला खरी ओळख बिग बॉसमुळे मिळाली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या त्याने केलेली सोशल मीडियावर चर्चा विषय ठरत आहे.

पुष्करच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करत असल्याचे सांगून माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील.”

पुष्करची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अनेकांनी पुष्करच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर काहींनी BMC कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी BMC ने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुष्कर जोग हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्यावर्षी त्यांनी ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. सध्या तो त्यांच्या आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.