Marriage : ४ वर्षांच्या मुलीने शाळेतच गुपचूप उरकला साखरपुडा, मुलाने गिफ्ट दिली चक्क १२ लाखांची सोन्याची वीट

Marriage : ‘बच्चे मन के सच्चे’ अशी एक म्हण आहे, परंतु कधीकधी मुलांचा निरागसपणा आणि प्रामाणिकपणा पालकांना महागात पडतो. असाच एक प्रकरण चीनमधून समोर आले आहे. चीनमधील सीचुआन या ठिकाणी एक अनोखी घटना घडली आहे. एका चार वर्षांच्या मुलीने शाळेतल्या मित्रासोबत गुपचूप साखरपुडा केला आहे. या घटनेमुळे तिच्या पालकांना धक्का बसला आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, एका लहान मुलाने आपल्या नर्सरी शाळेच्या वर्गात एका मुलीशी ‘साखरपुडा’ केला. इतकच नाही तर तिला १५,००० अमेरिकन डॉलर (सुमारे १२ लाख रुपये) भेट म्हणून दिले. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.

ही दोन मुले म्हणाता की, आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे. एके दिवशी त्यांनी एकमेकांना लग्नाची मागणी केली. दोघांनीही होकार दिला आणि मग त्यांनी गुपचूप लग्न केलं. त्यानंतर मुलाने मुलीला सोन्याची वीट गिफ्ट म्हणून दिली. ही वीट किमान १२ ते १५ लाख रुपयांची होती.

मुलगी घरी आल्यानंतर तिने ही सोन्याची वीट घरी दाखवली. तेव्हा तिच्या पालकांना धक्का बसला. त्यांनी तिची चौकशी केली. तिला ही वीट कुठून मिळाली असे विचारले . त्यावेळी मुलीने सगळी माहिती सांगितली. ही माहिती ऐकून आई वडीलांना घाम फुटला होता.

त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधला आणि ती वीट परत दिली. तेव्हा मुलाच्या पालकांनी देखील त्याची चौकशी केली. तेव्हा मुलगा आणि मुलीच्या पालकांनी दोघांनाही समजावून सांगितले. पण मुलांनी हट्ट धरला. यावेळी पालकांनी तुम्ही मोठे झाल्यावर लग्न करू शकता, असे म्हणत त्यांची समजूत काढली‌.

या घटनेमुळे शिक्षकही हैराण झाले आहेत. त्यांना समजत नाही की इतक्या लहान मुलांमध्ये लग्नाची इच्छा कशी जागृत झाली. दरम्यान, मुलाच्या पालकांनी सांगितले की, मुलाच्या घरी नवीन सुनेला सोन्याची वीट देण्याची परंपरा आहे. मुलाने या बद्दल कधी ऐकले असेल आणि तिला गिफ्ट म्हणून दिली असावी, असा अंदाज पालकांनी व्यक्त केला.