Maths Teacher: गणिताच्या शिक्षिकेनं 16 वर्षीय विद्यार्थ्यांबरोबर केला सेक्स; नंतर जे घडल ते चक्रावून टाकणार

Maths Teacher: अमेरिकेतील मिसौरी राज्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थ्याशी शाळेच्या मैदानात संबंध ठेवल्याप्रकरणी एका महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. या शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांना आजूबाजूला कोणी नाही ना यावर लक्ष ठेवण्याचे काम दिले होते.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव हॅली क्लिप्टन-कारमॅक आहे. ती पुलास्की काऊंटीतील लॅकी हायस्कूलमध्ये गणित विषय शिकवते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅली क्लिप्टनने 2022च्या ऑक्टोबर महिन्यात शाळेच्या मैदानात या विद्यार्थ्याशी संबंध ठेवले होते.

यावेळी तिने इतर विद्यार्थ्यांना आजूबाजूला कोणी नाही ना यावर लक्ष ठेवण्याचे काम दिले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हॅली क्लिप्टनला 25 लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना एका शाळेतील विद्यार्थ्यानेच दिली होती. आपल्या पाठीवर व्रण 16 वर्षीय विद्यार्थ्याने पोलीस अधिकाऱ्याला दाखवले होते. हॅली क्लिप्टनबरोबर असताना हे व्रण माझ्या पाठीवर उमटल्याचं या विद्यार्थ्याने सांगितलं आहे. त्यावेळी पोलिसांनी महिला शिक्षिकेचा मोबाईल चेक केला. तेव्हा हॅली क्लिप्टनचं विद्यार्थ्यांबरोबर लैंगिक संबंध असल्याचं समोर आलं.

दरम्यान या प्रकरणाची माहिती मुलाच्या वडिलांना असल्याचे ही समोर आले. या प्रकरणामध्ये मुलाचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आले. विशेष म्हणजे आता यासाठी ही महिला मुलाच्या वडिलांना काही पैसे देत होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महिला शिक्षिकेने 5 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस अधिकारी तिला पुलास्की काऊंटी पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेत आहेत. या प्रकरणाने मिसौरी राज्यात खळबळ उडाली आहे.

शाळेचे प्रशासन आणि पालकांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेत अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकते असे काहींचे म्हणने आहे.