बंडखोर आमदारांनी पाया पडून मागीतली शरद पवारांची माफी; म्हणाले, आम्ही चुकलो, आता…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात दोन गट पडलेले असताना अजित पवारांचा गट शरद पवारांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच उडाली आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते.

शरद पवारांना कोणतीही पुर्व कल्पना न देता, कोणतीही अपॉईंटमेंट न घेता ते शरद पवारांच्या भेटीसाठी थेट वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले होते. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तब्बल तासभर शरद पवारांशी चर्चा केली आहे.

या नेत्यांनी शरद पवारांना विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. पण शरद पवार यांनी अजूनही यावर भाष्य केलेले नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी पाया पडून शरद पवार यांचा आशिर्वाद घेतला आहे. तसेच आम्ही चुकलो म्हणत माफी मागितल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या भेटीची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीतून फुटून एक गट सत्तेत गेला आहे. तो गट शरद पवारांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवारांची माफी मागितली आहे. तसेच यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. त्यावर शरद पवार काहीही बोलले नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

या आमदारांनी शरद पवारांची भेट घेणं हे अनपेक्षित होतं. हे नेते अचानक भेटायला आल्यानंतर मला बोलवण्यात आलं. ते येतील याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. आता आम्ही शरद पवार यांच्यासोबत बसू तेव्हा याबाबत चर्चा करु. सध्या यावर काही बोलणं योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

ते आमदार अचानक भेटायला आले होते. त्यामुळे त्यातून त्यांचा काय उद्देश होता. हे आज सांगणं अवघड आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. खंत व्यक्त केली आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, असे ते शरद पवारांना म्हणत होते. पण शरद पवारांनी त्यावर काहीही भाष्य केलं नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.