मोदींच्या स्वप्नांवर पाणी! सुरत डायमंड बोर्समध्ये शुकशुकाट, महिन्याभरातच हिरे व्यापारी पुन्हा मुंबईकडे…

मोठा गाजावाजा करत सुरू झाललं गुजरात येथील सुरत डायमंड बोर्स संकटात सापडले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुजरातमध्ये सुरत डायमंड बोर्सचे (SDB) उद्घाटन करण्यात आले होते. याचा मोठा गाजावाजा केला गेला.

परंतु एक महिन्यातच याला खीळ बसली आहे. डायमंड बोर्स सर्वात जगातील मोठी कार्यालयीन इमारत आहे. याठिकाणी हजारपेक्षा जास्त हिरे व्यापार कार्यालये आहेत. असे असताना यासाठी पुढाकार घेणारे प्रसिद्ध हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी हे आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला असल्याची माहिती आहे.

सुरत शहर आणि बोर्स यांच्यामधील अंतर व्यापाऱ्यांना सोयीचे नाही. या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचाही अभाव आहे. याशिवाय कर्मचारी स्थलांतर करण्यास तयार नाहीत, अशी कारणे पुढे येत आहेत.

दरम्यान, सुरत डायमंड बोर्स सुरू होण्यापूर्वी मुंबई हिरे व्यापाराचे केंद्र मानले जात होते. SDB उघडल्यानंतर सुरत देखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र बनेल असे वाटते होते, मात्र तसे झाले नाही.

यामुळे मोदींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दोन दिवसांपासून सुरतहून व्यवसाय पुन्हा मुंबईला हालचाली सुरू झाल्या आहेत. सुरत डायमंड बोर्समधील किरण जेम्स सर्वात मोठी कंपनी आहे.

दरम्यान, मुंबईतील काही व्यापारी आपला व्यवसाय सुरतला हलवणार असल्याने राज्यात राजकारण रंगले होते. महाराष्ट्रातून व्यवसाय बाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरले, आता मात्र परिस्थिती बदलली आहे.