Mohammed Shami: शामी इतका डेंजर गोलंदाज कसा झाला? इतकं यश कस मिळतंय? स्वतःच सांगीतले सत्य..

Mohammed Shami : सध्या भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ मध्ये जोरदार कामगिरी करत आहे. सगळेच खेळाडू सध्या चांगली कामगिरी करत आहेत. असे असताना आता टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाने वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला.

यामुळे टीम इंडिया सेमीफायनमध्ये देखील गेली आहे. असे असताना चर्चा मात्र होत आहे ती भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीची. त्याने १६ धावात ५ विकेट घेतल्या. यामुळे त्याच्या नावावर अनेक विक्रम झाले आहेत.

भारताकडून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आता संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. यामुळे त्याची चर्चा सुरू आहे. हा सामना जिंकल्यानंतर मोहम्मद शमीने त्याच्या गोलंदाजीबद्दल एक मोठी गोष्ट सर्वांना सांगितली.

तो म्हणाला, हे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त योग्य लाइन आणि लेंथ शोधने आणि लय कायम ठेवण्याची गोष्ट आहे. मी नेहमी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू योग्य ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न असतो. चेंडूला योग्य दिशा देण्याचा माझा प्रयत्न असतो.

जर दिशा बिघडली तर कमबॅक करने अवघड असते. त्यामुळे पहिल्यापासून तोच प्रयत्न असतो. हे अवघड आहे पण मी पुन्हा चेंडूची दिशा आणि त्याचा टप्पा योग्य ठिकाणी ठेवतो. यात कोणतेही रॉकेट सायन्स नाही. शमीने फक्त ३ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. शमीच्या या कामगिरीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.

दरम्यान, वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. शमीने वर्ल्डकपमधील १४ सामन्यात एकूण ४५ विकेट घेतल्या आहेत. १८ धावात ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.