राज्य

महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सूनचे आगमन होणार, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती…

यावर्षी मोठ्या प्रमाणावर उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणावर त्रास लोकांना झाला. अनेक ठिकाणी तापमानाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. असे असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिली आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेव्हा उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो, अशी एक परिस्थिती असते. गेल्यावर्षी असच काहीसं बघायला मिळाले. यामुळे यावर्षी चित्र नेमकं कस असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही, परिणामी पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार असा अंदाज डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहेत. यावेळी पंजाबराव डख यांनी यंदा 22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे. यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. आता राज्यात पेरणीयोग्य पावसाला 22 जूननंतर सुरुवात होईल, अशी माहिती देखील डखांनी दिली आहे.

दरम्यान, 22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार आहे. तर महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास पाऊस होणार आहे. यामुळे शेतीच्या पूर्व मशागतीला सुरुवात देखील झाली आहे. पंजाबराव डख यांनी यंदा 22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे.

जुनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील, असा विश्वास पंजाबराव डखांनी व्यक्त केला आहे. यामुळे या काळात शेतकरी त्यांची कामे उरकून घेईल.

यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार, असे असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात पूर्व मौसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे. यामुळे शेतकरी याकडे लक्ष देऊन आहेत.

पंजाबराव डखांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच 7 मे पासून ते 11 मे 2024 पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्व मौसमी पाऊस पाहायला मिळू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. आता येणाऱ्या काळात काय परिस्थिती राहणार हे लवकरच समजेल.

Related Articles

Back to top button