दीड वर्षाच्या बाळासमोर आईची आत्महत्या, भावाने दिलेल्या माहितीमुळे सगळेच हादरले…

चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील पाग येथे एका उच्चशिक्षित विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.

याबाबत पती, सासू ,सासरे नणंद या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. कोमल सचिन दिलवाले हिने गुरुवारी आत्महत्या केली होती. याबाबत माहिती मिळाल्यावर तिच्या घरी मोठा धक्का बसला.

या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. सासरच्यांकडून पैसा व दागिन्यांसाठी तिचा छळ सुरू होता अशी तक्रार तिच्या भावाने दाखल केली आहे. यामुळे पोलीस याबाबत तपास करत आहेत. या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

कोमल सचिन दिलवाले हिने घरात कोणीच नसताना दीड वर्षाच्या मुलासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदन अहवाल मिळेपर्यंत पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नव्हता. याबाबत कुटूंबियांना एकच आक्रोश केला.

दरम्यान, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला तिने नोकरी करू नये असे सासऱ्यांनी सांगितले होते.

पण नंतर कोमलने नोकरी करावी यासाठी तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. याच काळात तिला क्रिशू नावाचे बाळ झाल्याने नोकरी करणे अवघड झाले. यामुळे वाद वाढतच होता. अखेर तिने आपले आयुष्य संपवले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.