Motorcycle accident : बहराइचमध्ये रात्री उशिरा झालेल्या अपघातात मोटारसायकलवर असणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्या असून त्यांच्या 6 मुली जखमी झाल्या आहेत. त्यापैकी दोघींची प्रकृती गंभीर होती. त्यांना लखनौला पाठवले जात होते.
मात्र पिकअपमध्ये बसवत असताना एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात जखमी झालेल्या मुलींचे वय दहा वर्षांच्या ते चार महिन्यांपर्यंत आहे.
राम गावातील काजीजोत येथे राहणारा दुर्गेश पत्नी शकुंतला आणि 6 मुलींसह बाईकवरून हरडी येथील सासरच्या घरी जात होता. देहात कोतवाली अंतर्गत जिंघाघाट येथील स्मशानभूमीजवळ मोटारसायकलची पिकअपला धडक बसली.
ही धडक इतकी जोरदार होती की पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या मदतीने रागणी, शिवांगी, कोमल, मनीषा, लक्ष्मी आदी सहा बहिणींना वैद्यकीय महाविद्यालयात आणले. या आई वडील नसणाऱ्या मुलींना जखमी पाहून सर्वांच्याच अंगाला काटा आला.
मुलींवर उपचार सुरू झाले पण डॉक्टर 4 महिन्यांच्या लक्ष्मीला वाचवू शकले नाहीत. उर्वरित एकीची प्रकृती गंभीर असून तिला लखनौला रेफर करण्यात आले आहे. उर्वरित 4 जणींवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
रूग्णालयात उपस्थित असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ग्रामीण, पवित्र मोहन त्रिपाठी यांनी सांगितले की, ज्या पिकअपमध्ये अपघात झाला ती घटनास्थळी उभी आहे, मात्र चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
मोटारसायकलवरील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी हे या अपघातामागे एक कारण असले तरी धुके हेही कारणीभूत मानले जात आहे. तराई जिल्ह्यात बहराइचमध्येही धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. अपघात स्थळापासून नदीचे अंतरही खूपच कमी असल्याने येथे धुके होते.