Mumbai Crime : लॉजमध्ये वाढदिवस साजरा करुन प्रेयसीला संपवले, विवाहित प्रेयसीसोबत घडलं भयंकर…

Mumbai Crime : प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना तुर्भे येथून समोर आली आहे. तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातून त्याने हे कृत्य केले आहे. नवी मुंबईमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, मृत तरुणी एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. शोएब शेख असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आले आहे. पोलिसांना आरोपी प्रियकराला अटक केली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. मुलगी अमित कौरचा काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत होते. ते एकमेकांना भेटत होते. सोबत राहत होते. मात्र शोएबच्या डोक्यात भलतच काहीतरी सुरु होत.

दरम्यान, अमितचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शोएबला होता. यामुळे वाद होत होता. अमित आपल्याला फसवत आहे, असा संशय शोएबला होता. यातून शोएबने अमितला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी अमितचा वाढदिवस होता. यामुळे त्यांनी भेटायचं ठरवलं. लॉजवर त्यांनी एक रूम देखील बुक केली. मात्र रुममध्ये शोएब आणि अमितमध्ये कडाक्याचे भांडण झालं. यानंतर शोएबने अमितचा गळा आवळून तिची हत्या केली. क्षणात सगळं काही त्याने संपवले.

नंतर तो लगेच बाहेर पडला. तेथील कर्मचाऱ्यांनी देखील त्याला पाहिले. मात्र त्यांना फारसा संशय आला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खोली उघडली तेव्हाच त्यांना अमित कौरचा मृतदेह खोलीत आढळून आला. यामुळे सगळेच हादरून गेले होते.